Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, चार जणांना अटक; कर्वेनगर मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मावस भावासोबत भांडण झाल्याने समजावून सांगण्यासाठी बोलवले असता सहा जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलावर (Minor) व त्याच्या सोबत असलेल्या मित्रांवर कोयत्याने वार (Koyta Gang) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. ही घटना शुक्रवारी (दि.22) दुपारी तीनच्या सुमारास कर्वेनगर येथील स्पेन्सर चौकातील सार्वजनिक रोडवर घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी (Pune Police) चार जणांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

संदेश बालाजी आवटे (वय-17 रा. बराटे चाळ, कर्वेनगर) याने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) शनिवारी (दि.23) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आदित्य चुरी, यश कोंढे, सुयश ढोरे, यश शिंदे यांना अटक केली आहे. तर आर्यन पाटणकर व अनिल विश्वकर्मा यांच्यावर आयपीसी 307, 143, 144, 147,148, 149 सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदेश आवटे याचा मावस भाऊ रुद्र सुकाडे याचे आदित्य चुरी व त्याच्या भावासोबत भांडण झाले होते. त्यामुळे संदेश याने आरोपींना समजावून सांगण्यासाठी लक्ष्मी टेरेस बिल्डींग समोरील सार्वजनिक रोडवर बोलावले होते. आदित्य चुरी हा त्याच्या साथीदारांसह त्याठिकाणी आला. त्याने फिर्यादी व त्यांच्या मित्रांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.
संदेश याने शनिवारी अलंकार पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर
पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतपाळे (PSI Satpale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पीएमपीएमएल बस कर्मचाऱ्याला मारहाण करुन रोकड पळवली, दोघांना अटक; बिबवेवाडी परिसरातील घटना

‘आम्ही इकडचे भाई आहोत’ हवेत कोयते फिरवून एकावर वार, येरवडा परिसरातील प्रकार

जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळली, एकाला अटक; कर्वेनगर परिसरातील घटना

घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली; 8 लाख 21 हजार 594 रुपयाचा दंड वसूल

हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या तिरुपती उर्फ टक्या लष्कर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 105 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA