ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 7 हजार रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | दाखल गुन्हयातील तपासकामी पुण्याला जाण्याकरिता 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 7 हजार रूपयाची लाच (Nashik Bribe News) घेणार्‍या सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गंगाराम डगळे (API Sagar Gangaram Dagle) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे (Nashik Crime News). त्यांच्याविरूध्द सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर डगळे हे नाशिक शहरातील उपनगर पोलिस ठाण्यात (Upnagar Police Station Nashik) कार्यरत आहेत. (ACB Trap News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावाविरूध्द नाशिक शहरातील उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हयाच्या तपासकामी पुणे येथे जाण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गंगाराम डगळे यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. (ACB Trap News)

प्राप्त तक्रारीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सापळा रचला असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गंगाराम डगळे यांनी दि. 3 मे 2023 रोजी तडजोडीअंती सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून नाशिक येथील सिव्हील हॉस्पीटल (Nashik Civil Hospital) बसस्टॉपच्या जवळील रोडवर 7 हजार रूपये घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Nashik ACB Trap)

 

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Walawalkar),
अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल बागुल
(PI Anil Bagul) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- ACB Trap News | Anti-corruption Bureau: Assistant Police Inspector caught in anti-corruption net while accepting bribe of Rs.7 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात रोखला दुसरा बालविवाह

Maharashtra Politics News | राज्यात 11 मे नंतर नवं सरकार स्थापन होणार? राजकीय तज्ज्ञांचा दावा

Pune Mahavitaran News | प्रतिसाद वाढल्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी वेग द्या – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच : मोबाईल कंपनीची फसवणूक करणार्‍या टोळीस गुन्हे शाखेकडून अटक

Mahavitran HR Director Arvind Bhadikar | महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी अरविंद भादीकर यांची निवड