ACB Trap News | न्यायालयाच्या आदेशावरुन जमीन नावावर करण्यासाठी लाचेची मागणी, रक्कम स्वीकारताना तलाठी व खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | न्यायालयाच्या आदेशानुसार जमीन सुनेच्या नावावर करण्यासाठी पाटोदा तहसील कार्यालयातील सौताडा येथील तलाठी व खासगी व्यक्ती यांना 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Beed ACB) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.30) पाटोदा तालुक्यातील वांजरा फाटा येथे करण्यात आली. (ACB Trap News)

तलाठी प्रवीण संदीपान शिंदे, खासगी व्यक्ती विशाल ठाकरे (वय-20 रा. सुप्पा, ता. पाटोदा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 66 वर्षीय व्यक्तीने बीड एसीबीकडे तक्रार केली आहे. (ACB Trap News)

तक्रारदार यांच्या मुलीच्या नावावर सौताडा शिवारात जमीन आहे. याबाबत दिवाणी न्यायालय, पाटोदा (Civil Court, Patoda) येथे दिवाणी प्रकरणा मध्ये तडजोड झाल्यानंतर दिवाणी न्यायालयाने तक्रारदार यांच्या सुनेचे नावावर ही जमीन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तक्रारदार यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सौताडा सज्जा तलाठी यांच्याकडे न्यायालयीन आदेशाची प्रत व अर्ज दाखल केला होता. तलाठी प्रवीण शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. तसेच मुद्रांक शुल्क (Stamp Duty) न भरता काम करून देण्याची हमी दिली. याबाबत तक्रारदार यांनी बीड एसीबीकडे तक्रार केली.

एसबीच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी प्रवीण शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाच मागून
लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तर खाजगी इसम विशाल ठाकरे याने लाच मागण्यासाठी शिंदे यांना प्रोत्साहन
दिले. प्रवीण शिंदे यांनी तक्रारदार यांचे कडून 20 हजार रुपये लाच स्वीकारताना वांजरा फाटा येथे रंगेहाथ पकडले आहे.
दोन्ही आरोपी विरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात (Patoda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर (Addl SP Rajeev Talekar) यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबीचे
पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे (DySP Shankar Shinde), पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड,
गणेश मेहेत्रे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane | राणे पत्रकारांवरच भडकले, कोण आहे जरांगे पाटील? मी ओळखत नाही, कशाला सतत नाव घेता…

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर टीका, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक

Praful Patel | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? प्रफुल्ल पटेल स्पष्टच म्हणाले – ”घड्याळ तेच वेळ नवी…”

Pune Pimpri Crime News | बँक खाते हॅक करून महिलेला लाखोंचा गंडा, वाकड परिसरातील घटना

Pune Crime News | आत्महत्या करण्यापुर्वी बनवला व्हिडीओ अन् इमारतीच्या 6 व्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाची आत्महत्या, कोंढवा परिसरातील घटना