Praful Patel | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? प्रफुल्ल पटेल स्पष्टच म्हणाले – ”घड्याळ तेच वेळ नवी…”

कर्जत : Praful Patel | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. यासंदर्भातील प्रकरण निवडणूक आयोग आणि विधिमंडळाकडे सुरू आहे. तरीही शरद पवार (Sharad Pawar)- अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येणार, अशा चर्चा सातत्याने सुरू असतात. यावर आता अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी स्पष्ट खुलासा केला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय चिंतन शिबीर कर्जत येथे आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते.

प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, अजित पवारांच्या नेतृत्वात पुढील वाटचाल काय असावी हे निर्धारित करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. घड्याळ तेच, वेळ नवी ही आमची टॅगलाईन आहे. दोन्ही गट एकत्र येणार असे अनेकांकडून दिशाभूल करण्याचे काम होत आहे. पण आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वातच काम करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत हे आम्ही स्पष्ट करतो.

प्रफुल पटेल म्हणाले, निवडणूक आयोग (Election Commission) घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या कार्यवाहीवर भाष्य करणार नाही. आमच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. आम्ही जो निर्णय घेतला आहे त्यात कुठेही अडचण येणार नाही. निवडणूक आयोगाच्या सुनावणीत समोरच्यांकडे काही मुद्दे नाहीत. त्यामुळे वेगळे मुद्दे मांडले जात आहेत. ज्यांच्याकडे मुद्दे नसतात ते किरकोळ मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रफुल पटेल म्हणाले, सुनावणीनंतर त्यांचे वकील कार्यकर्त्या सारखे ब्रिफ्रिंग करत असतात हे हास्यास्पद आहे.
जे काही आहे ते सत्य बाहेर येणारच आहे. आम्हाला जे पुरावे द्यायचे होते ते आम्ही दिले.
बाकीचे सगळे मुद्दे जे आज उपस्थित केले त्याचा खुलासा होणार आहे. आमची बाजू मांडण्यात अडचण वाटत नाही.
आमच्या वकिलांना संधी मिळाल्यास एकाच सुनावणीत सर्व मुद्दे मांडू.

प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले, निवडणूक आयोगात काय भूमिका मांडली हे आम्हाला माहिती आहे.
जगात असे कुठेही लिहिले नाही की आजचे २ मित्र उद्या भांडू शकत नाही. आज एकत्र असणारे २ व्यक्ती उद्या वेगळी भूमिका घेऊ शकत नाही ? जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा फालतू मुद्दे घेतले जातात. पक्षात कालपर्यंत आम्ही एकत्र होतो आणि आज आमची नवीन भूमिका आहे.

प्रफुल पटेल म्हणाले, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) जे काही बोलले त्यात कुठेही सरकारच्या विरोधात विधान नाही.
ओबीसीला (OBC Reservation) धक्का न लावता मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याची सर्वांची
सहमती आहे. मराठा समाजाला आरक्षण कायद्याच्या चौकटीत हवे अशी आमची ठाम भूमिका आहे.
जेव्हा मुख्यमंत्री जरांगे यांच्या उपोषणावेळी गेले होते त्यावेळी निजामकाळातील दाखले असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्रे
मिळावे यासाठी समिती नेमली होती. त्या प्रसंगावर भुजबळ बोलले.
परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही असे विधान आमच्यापैकी कुणाकडूनही आलेले नाही.

प्रफुल पटेल म्हणाले, राष्ट्रवादीच्या भविष्याबाबत शिबिरात चर्चा केली जात आहे.
शिबीराच्या माध्यमातून आम्ही राजकीय उत्तर देऊ. पक्ष सांभाळायचा ही प्राथमिक जबाबदारी आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचे आहे. महत्त्वाच्या विषयात राष्ट्रवादीची भूमिका काय असावी? राज्याचा विकास
आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काय करता येईल शिबिरात चर्चेवर भर देण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | मारहाण करुन नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; म्हाळुंगे परिसरातील घटना

Pune Police MCOCA Action | पीएमपी चालकाचा खून करणाऱ्या सोमनाथ कुंभार व त्याच्या साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 92 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

MLA Bacchu Kadu | भुजबळांकडून ५ कोटींचा बोभाटा; बच्चू कडूंनी सांगितलं फक्त इतक्याच मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात