ACB Trap News | एक कोटीची लाच मागणाऱ्या सहायक राज्यकर आयुक्तांवर एसीबीकडून FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर प्रकरण निकाली काढण्यासाठी कंपनीच्या संचालकाकडून एक कोटी रुपयांची लाच (Accepting Bribe) मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक राज्यकर आयुक्त व जीएसटी विभागाच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap News)

सहायक राज्यकर आयुक्त अर्जुन प्रकाश सुर्यवंशी (Arjun Prakash Suryavanshi) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अर्जुन सूर्यवंशी हे वस्तू व सेवाकर विभाग, माझगाव, मुंबई येथील अन्वेषण-क विभागात कार्य़रत आहेत. विशेष राज्यकर आयुक्त तथा मुख्य दक्षता अधिकारी मुंबई यांनी महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांना अर्जुन सुर्यवंशी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन कारवाई करण्याबाबत पत्र पाठवले होते. यानंतर एसीबीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान, अर्जुन सूर्य़वंशी आणि त्याच्या पथकाने गेल्या वर्षी 25 जुलै ते 7 ऑगस्ट 2023 दरम्यान एका कंपनीवर छापा टाकला होता. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची कराची थकबाकी होती. कंपनीच्या संचालकांना नोटीस पाठवून थकीत कर भरण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी थकीत कराचा भरणा केला नाही. त्यानंतर जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी भेट दिली.

21 ऑगस्ट रोजी सूर्यवंशी यांनी कंपनीच्या संचालकांना व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून कर प्रकरण निकाली काढण्यासाठी
एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
तसेच यामध्ये इतर अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग नाकारता येत नसल्याने त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक
कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई एसीबी बृहन्मुंबई विभागाचे अपर पोलीस आयुक्त विजय पाटील, पोलीस उपायुक्त राजेंद्र सांगळे, पोलीस उपायुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली एसबी बृहन्मुंबई पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

PMC Recruitment Civil Engineer | पुणे महापालिका : सिव्हिल इंजिनियर पदाच्या 113 जागांसाठी 29 हजार 924 अर्ज

जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी

व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्‍या भावाचा खून; शिरुरमधील घोडनदीच्या पात्रात सापडला होता मृतदेह, बीडमधून तिघांना अटक