ACB Trap News | पोलीस निरीक्षकासाठी 1 लाख रूपयाची लाच मागणारा पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर, पीआय ‘गोत्यात’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – तडीपार (Tadipar) व एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत (MPDA Act) कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक (PI) यांच्यासाठी एक लाख रुपये लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) शिर्डी पोलीस ठाण्यातील (Shirdi Police Station) पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. संदिप गडाख Sandip Gadakh (वय-40) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे (Police Constable) नाव आहे. ही कारवाई नाशिक एसीबीने (ACB Trap News) केली.

याबाबत नाशिक येथील 27 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात आयपीसी 354 चा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच त्यांच्यावर तडीपार व एम.पी.डी.ए कायद्यानुसार कारवाई न करण्यासाठी संदिप गडाख याने 15 जुन रोजी पोलीस निरीक्षक दुधाळ (Police Inspector Dudhal) यांच्यासाठी 1 ते दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 30 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap News) तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता संदिप गडाख यांनी तक्रारदार यांच्याकडे पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यासाठी लाचेची रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच तडजोडी अंती ठरलेली 30 हजारांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर 26 जुलै रोजी गडाख यांनी पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी करुन स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने एसबीने संदिप गडाख यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उप अधीक्षक वैशाली पाटिल (DySP Vaishali Patil), पोलीस निरीक्षक शरद हेम्बाडे (PI Sharad Hembade),
पोलीस निरीक्षक परशुराम जाधव (Parashuram Jadhav) यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | … तर राजकारणात सक्रिय व्हायला तयार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचे राजकारणात येण्याचे संकेत

NCP | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे, पक्षातील फुटीनंतर शरद पवार गटाकडून नियुक्ती

Pune Police MCOCA Action | पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात दहशत माजविणाऱ्या राहुल शेंडगे
व त्याच्या इतर 10 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 54 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA