ACB Trap Pune | 2000 हजाराची लाच घेताना पुणे GST कार्यालयातील महिला अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरु करण्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट (Clearance Certificate) देण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) वस्तू व सेवा कर कार्यालय, येरवडा (Goods and Services Tax Office, Yerwada) कार्यालयातील राज्य कर निरीक्षकाला (State Tax Inspector) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune ) सापळा रचून रंगेहात पकडले. वस्तू व सेवा कर कार्य़ालय येरवडा (GST) येथील राज्य कर निरीक्षक जोत्स्ना रामचंद्र कोरडे Jotsna Ramchandra Korade (वय-35) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap Pune) ही कारवाई गुरुवारी (दि.2) केली.
याप्रकरणी 46 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Trap Pune) तक्रार केली आहे. आरोपी ज्योत्स्ना कोरडे या वस्तू व सेवा कर कार्यालय येरवडा येथे राज्य कर निरीक्षक म्हणून कार्य़रत आहेत. तक्रारदार यांचे गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरु करुन क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी ज्योत्स्ना कोरडे यांनी दोन हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता ज्योत्स्ना कोरडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज (गुरुवार) सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील (Police Inspector Jyoti Patil), पोलीस कॉन्स्टेबल अंकुश आंबेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा डेरे, चालक पोलीस नाईक चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.
Web Title :- ACB Trap Pune | While taking bribe of Rs 2000 GST Yerwada Office Lady Officers
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Latur Doctor Suicide News | दीड कोटीच्या खंडणीला वैतागून डॉक्टरची आत्महत्या
- Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रातील अनेक भागात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; मुंबई, पुण्यात मान्सून बरसणार ?
- PFRDA New Rule | NPS मध्ये गुंतवणूक करणार्यांसाठी खुशखबर ! आता होईल मोठा फायदा; नवी गाईडलाईन जारी
- Sakinaka Rape Murder Case | साकीनाका बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय
- CM Uddhav Thackeray | औरंगाबाद पाणीप्रश्नावरून CM उद्धव ठाकरेंचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश; म्हणाले – ‘मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा’