Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रातील अनेक भागात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; मुंबई, पुण्यात मान्सून बरसणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | मोसमी पाऊस केरळमध्ये (Kerala) दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) दोन दिवसांपूर्वी केली होती. त्याचबरोबर देशात पुरेशा प्रमाणात पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. यानंतर आता महाराष्ट्रातील अनेक भागात (Maharashtra Monsoon Update) मान्सून पूर्व पावसाने (Pre-Monsoon Rains) हजेरी लावली आहे. कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सोलापूर (Solapur), तसेच कोकणातील (Konkan) काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाचा पाऊस झाला आहे.

 

मान्सूनचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान यंदा देशात पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आली आहे. यंदा देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा देशात सगळीच धरणे भरण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)

आज (2 जून) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान, मुंबई (Mumbai), पुण्यामध्ये (Pune) पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात तापमानात वाढ झाल्याने मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवले आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात वर्धा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

 

दरम्यान, पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत असून, उकाड्यात वाढ झालीय.
रत्नागिरी, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी, तर नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon is in full swing in maharashtra with heavy rains lashing many districts

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा