Pune : कंटेनरने दिलेल्या धडकेत 4 म्हशी मृत्यूमुखी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कंटेनरने दिलेल्या धडकेत चार म्हशी मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. मुंबई-बंगळुरू बाह्यवळणावर दरी पूलावर ही घटना घडली. या अपघातानंतर कंटेनर उलटल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली.

जांभुळवाडीतील ज्ञानोबा पंढरीनाथ जांभळे यांच्या मालकीच्या या चार म्हशी होत्या. जांभळे यांच्या म्हशी आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दरी पुल परिसरात चरत होत्या. त्यानंतर काही वेळाने म्हशी गोठ्याकडे परतत होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने नवीन कात्रज बोगद्याकडून पुण्याकडे कंटेनर निघाला होता. चालकाचे नियत्रंण सुटल्याने त्याने तीन म्हशींना धडक दिली. त्यानंतर कंटेनरच्या मागच्या चाकात एक म्हैस अडकली. त्यामुळे कंटेनर उलटला. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने कंटेनर रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक पूर्ववत केली. भारती विद्यापीठ पोलिसांनी कंटनेर चालकाला ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.