पाथरी-सोनपेठ रोडवर एसटी बस आणि ट्रकचा अपघात

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी सोनपेठ रोडवरील डाकू पिंपरी पाटी जवळ समोरून येणाऱ्या टिप्पर व सोनपेठकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

हा अपघात वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर (क्र एम.एच.48 टी 3282) व एसटी बस (एमएच 20 बी.एन.0790) यांच्यात झाला आहे. टिप्पर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बसच्या पाठीमागील संकट कालीन खिडकीचे काच फुटले तसेच एंगल पिल्लरचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघातानंतर एसटी बसचे चालक वाव्हळे यानी वरिष्ठांना फोनवरून घटनेची माहिती दिली.

You might also like