मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघातात वीज वितरणचा कर्मचारी जागीच ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वीज वितरण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रावण दगाजी मोहिते (वय 49, रा. 132 के. व्ही. एम. एस. सी. बी. कॉलनी, धुळे) असे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोहिते हे मंगळवारी मध्यराञी दोन वाजता कामकाज ओटोपून  मोटरसायकलने मुंबई-आग्रा महामार्गाहुन गुरुद्वारा समोरील उड्डाणपुलाहुन घराकडे येत होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. ही वार्ता कॉलनीत कळताच सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहे.

You might also like