वर्षभरापासुन गुंगारा देणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तो मागील एक वर्षापासून पोलिसांना सापडला नव्हता.

नितीन बबन शिंदे (रा. पंचहौद चौक, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या युनीट १ चे पथक गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी मल्लिकार्जून स्वामी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मागील १ वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नितीन शिंदे हा पंचहौद चौकाजवळील रस्त्यावर उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने गुन्हा दाखल असल्यापासून फरार असल्याचे सांगितले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, वैभव स्वामी, अनिल घाडगे, बाबा चव्हाण यांच्या पथकाने केली.

सिने जगत –

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज