इतिहासात पहिल्यांदाच ! खुनाच्या गुन्ह्यातील कैदी IAS, IPS ची परीक्षा देण्यासाठी जाणार ‘विमानानं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कारागृहात असलेल्या कैद्यानं शिक्षण घेतल्याचं आपण ऐकलं आहे. कैद्यांनी कारागृहातून उच्चशिक्षणही घेतलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. कैदी IAS, IPS ची परीक्षाही देतात. मात्र दिल्लीच्या तुरुंगात खुनाच्या गुन्ह्यात असलेला कैदी चक्क IAS, IPS ची परीक्षा देण्यासाठी विमानाने उड्डाण भरणार आहे.

कोण आहे हा कैदी

इंफाळचा बेंजी हा एका खून प्रकरणातील आरोपी आहे. तो सध्या याप्रकऱणात दिल्लीतील कारागृहात आहे. तो UPSC ची परीक्षा देणार आहे. त्याने या परीक्षेला जाण्यासाठी न्यायालयाकडे जामीन देण्याची विनंती केली होती. शुक्रवारी यावर सुनावणी झाली. त्याच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. जामीन दिल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या जामीनाला विरोध केला. न्यायालयानेही त्याला जामीन नाकारला.

परीक्षा देण्यास न्यायालयाची परवानगी

बेंजीला परीक्षा देण्याची परवानगी न्यायालयानं दिली. परंतु १२ मे रोजी परीक्षा आहे. रेल्वेने गेल्यास उशीर होईल. म्हणून त्याला विमानाने जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली. त्याला ११ मे रोजी विमानाने इंफाळला नेण्यात येणार आहे.

पोलिसांचा खर्च कारागृह प्रशासन करणार

बेंजीला विमानाने जाण्याची परवानगी तर न्यायलयाने दिली. परंतु तो जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातील आहे. तो स्वत: चा खर्च तर करू शकतो. परंतु त्याला पोलिसांचा खर्च झेपावणारा नाही. असं त्याच्या वकिलांनी सांगितले. त्यावेळी बेंजीचा खर्च कारागृह प्रशासनाने करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

आज जाणार विमानाने इंफाळला

११ मे म्हणजे आज त्याला विमानानं इंफाळला नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला रात्रभर जवळच्या एका पोलीस ठाण्यात ठेवलं जाईल. उद्या म्हणजे १२ मे रोजी त्याने परीक्षा दिल्यानंतर त्याला १३ मे रोजी दिल्लीच्या तुरुंगात परत आणलं जाणार आहे.