स्वारगेट विभागाच्या सहाय्यक आयुक्‍तपदी व्ही.पी. नांदेडकर यांची नियुक्‍ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वारगेट विभागाच्या सहाय्यक आयुक्‍तपदी व्ही.पी. नांदेडकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राज्य पोलिस दलात मोठया प्रमाणावर बदल्या झाल्या आहेत. त्यानंतर सर्वत्र बदल झाले आहेत. शहर वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्‍तपदी पंकज देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे तर स्वारगेट एसीपी म्हणून व्ही.पी. नांदेडकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

एसीपी व्ही.पी. नांदेडकर हे रत्नागिरी जिल्हयातील खेड उपविभागात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची तेथुन पुणे शहरात बदली झाली. ते हजर झाल्यानंतर आता त्यांची नियुक्‍ती स्वारगेट विभागात सहाय्यक आयुक्‍त म्हणुन करण्यात आली आहे. साताराचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुण्यात बदली झाली. ते हजर झाल्यानंतर त्यांची पुण्याच्या वाहतूक शाखेत पोलिस उपायुक्‍त म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे.