‘महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता’, गोवंश हत्याबंदीवरुनमुख्यमंत्र्याचा भाजपवर ‘घणाघात’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्यादिवशी भाजपाने केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू का केलेला नाही? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सर्व हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? अशी प्रश्नांची सरतबत्ती करत ठाकरे यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर व भाजपाचे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी गोवंशाबाबत केलेल्या विधानांची आठवण भाजपाला करू दिली. ते राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला सावरकरांच्या स्वप्नातला अखंड हिंदुस्तान हवा आहे. तुम्हाला हवा आहे की नाही? सावरकरांचे सर्व हिंदूत्व मान्य मान्य असेल तर गोवंश हत्याबंदीचा कायदा संपूर्ण देशात लागू का झाला नाही ? दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात गोमांस मी कमी पडू देणार नाही असे विधान केले होते. तर किरेन रिजीजू यांनी मी गोमांस खाणार, कोणाला काय करायचंय ते करा, असे म्हटले होते. महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/