Actor Hrithik Roshan | अभिनेता हृतिक रोशन पुन्हा चढणार बोहल्यावर; गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दुसरा विवाह

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता हृतिक रोशन (Actor Hrithik Roshan) हा सध्या त्याच्या आगामी फायटर चित्रपटामुळे व त्याच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. हृतिक रोशनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी आतापर्यंत समोर आल्या आहेत. हृतिक सध्या सबा आझादला (Saba Azad) डेट करत असून अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. अभिनेता हृतिक रोशन (Actor Hrithik Roshan) व सबा अनेकदा इव्हेंटमध्ये एकत्र दिसत होते. अखेर या वर्षीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली. आता हे कपल त्यांचे नाते पुढे घेऊन जाणार असून लवकरच ते लग्नबंधनात अडकले आहेत.

अभिनेता हृतिक रोशन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचा 2014 साली सुझान खान (Suzanne Khan) सोबत घटस्फोट झाला होता. (Hrithik Roshan Divorce) हा देशातील सर्वात महागडा व मोठा घटकस्फोट ठरला होता. हृतिकने सुझानला पोटगी म्हणून जवळपास ४०० कोटी रुपये दिले होते. यानंतर हृतिकच्या आयुष्यात गर्लफ्रेंड सबा आझादच्या रुपाने पुन्हा एकदा प्रेम आले. (Hrithik Roshan Girlfriend) आता त्यांचे प्रेमाचे नाते लवकरच ऑफिशल होणार असून ते एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार हे कपल लवकरच लग्न करणार आहेत. (Hrithik Roshan Wedding) त्यांची लग्नाची तारीख व स्थळ याबाबात अद्याप माहिती समोर आलेली नाही. मार्च महिन्यामध्ये ते लग्न करणार अशी अफवा पसरवण्यात आली होती. मात्र हृतिकने ते खोडून काढले होते.

अभिनेता हृतिक रोशन व सबा हे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची ओळख एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. नाते ऑफिशियली जाहीर केल्यानंतर ते एकमेंकांसोबचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. (Hrithik Roshan Love Affair) अभिनेता हृतिकने त्यांच्या फॅमिलीशी सुद्धा सबाची ओळख करुन दिली आहे. मात्र राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी याबाबत काही माहित नसल्याचे सांगितले होते. आता हे कपल लग्नबंधनात कधी अडकणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.

सध्या हृतिक (Actor Hrithik Roshan) हा त्याच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटाच्या (Fighter Movie) कामात व्यस्त आहे. या बिग बजेट चित्रपटामध्ये हृतिक सोबत दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अनिल कपूर (Anil Kapoor), अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) हे कलाकार अभिनय साकारणार आहेत. त्याच्या या चित्रपटाचा फर्स्टलूक रिलीज करण्यात आला. याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला (Fighter Movie Release Date) असून पुढील वर्षी ‘फायटर’ सिनेमा रिलीज होणार असल्याची शक्यता आहे.

Web Title :   Actor Hrithik Roshan | hrithik roshan and saba azad are planning to settle down and tie the knot very soon

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा