Maharashtra Rain Update | राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; शेतीच्या कामांना येणार गती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Update) झाला आहे. कोकणासह (Konkan) मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. अनेक दिवस शेतकरी (Farmer) पावसाची वाट पाहत होते. पावसामुळे शेतकऱ्यांची कामे विस्कळीत झाली. आता शेतीच्या कामाला गती येणार आहे. राज्यात धुळे (Dhule), हिंगोली (Hingoli), परभणी (Parbhani), मुंबई (Mumbai) येथे जोरदार पाऊस झाला आहे.

हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार (Maharashtra Rain Update) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. साक्री शहरात धुवाधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. वसमत तालुक्यातील आकोली वसमत रोडवर असलेल्या ओढ्याला या पावसामुळे पूर आला होता. तर पुरात अडकलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना नागरिकांनी मानवी साखळी करत बाहेर काढले. यावर्षीच्या मोसमातील हा सर्वात पहिला मोठा पाऊस समजला जात आहे. मागील एक महिन्यापासून शेतकरी या पावसाची वाट पाहत होते. आज अखेर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) काही भागात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळच्या सुमारास पाथरी, जिंतूर, मानवत, गंगाखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसाने काही ठिकाणी ओढ्याला पूर आला आहे.

अनेक राज्यात संततधार –

हवामानाच्या अंदाजानुसार (IMD), कोकण (Konkan), गोवा (Goa) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) आज (गुरूवारी) जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातमध्ये 7 जुलैला पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यामध्ये आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवला आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल तसेच सिक्कीम, तामिळनाडू, पुडुचेरीत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title :  Maharashtra Rain Update | heavy rain in many places in the state Indian Meteorological Department Marathwada Konkan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा