Maharashtra Election Survey Result | आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली तर कोण जिंकणार? सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Election Survey Result | अनेक महिन्यापासून राज्याच्या राजकारणातील घडामोडी अधिक वेगाने बदलताना दिसत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेले बंड त्याचे एक उदाहरण आहे. अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातच मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर राजकारणाचे नवीन समीकरण तयार झाल्याचे दिसत आहे. अशातच राज्यात सध्या लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) झाली तर निकाल काय असणार, याचा एक निष्कर्ष (Maharashtra Election Survey Result) समोर आला आहे.

एका सर्वेक्षणानुसार, आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती मताधिक्य मिळेल? हा प्रश्न सर्वेक्षणात (Maharashtra Election Survey Result) सहभागी झालेल्या लोकांना विचारण्यात आला. दरम्यान, या सर्वेक्षणाचे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली तर भाजपच्या (BJP) पारड्यात अधिक मताधिक्य पडले आहे. सर्वेक्षणात भाजपला (BJP) 43.10 टक्के तर महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) 42.10 टक्के मते मिळाली. तर इतरांना 14.80 टक्के मते मिळाली आहेत.

महाविकास आघाडीच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजप आघाडीवर असल्याचे सर्वेक्षणातून (Survey) स्पष्ट झाले असले तरी संख्येच्या बाबतीत महाविकास आघाडी भाजपपेक्षा फारशी मागे नाही. महाविकास आघाडीचे मताधिक्य भाजपच्या तुलनेत केवळ एक टक्का कमी आहे.

कोणत्या पक्षाला किती टक्के मते?

भाजपची मतांची टक्केवारी : 43.10 टक्के
महाविकास आघाडीची मते : 42.10 टक्के
इतरांच्या मतांचा वाटा : 14.80 टक्के

भाजपची आधीच तयारी –
दरम्यान, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आधीच तयारी सुरू केली आहे. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने प्रादेशिक युनिट्सची एक मोठी संघटनात्मक पुनर्रचना सुरू केली आहे, ज्याला 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. संघटनात्मक बदलांमध्ये तेलंगणा, पंजाब आणि झारखंडचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी (Union Minister G. Kishan Reddy), सुनील जाखर (Sunil Jakhar) आणि बाबूलाल मरांडी (Babulal Marandi) यांची नावे आहेत.

Web Title :  Maharashtra Election Survey Result | bjp mva vote share in lok sabha 2024 eknath shinde uddhav thackeray ncp political crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा