‘या’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय सनी देओलचा मुलगा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने नुकताच (मंगळवार दि २३ एप्रिल) भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही सनीपाजी उतरला आहे. अजय सिंग देओल असं त्याचं खरं नाव आहे. घरात सगळे अजयला सनी नावाने हाक मारायचे. त्यामुळे सिनेमात पदार्पण करतानाही त्याने सनी हेच नाव लावण्याचं ठरवलं. पुढे सनी हीच त्याची ओळख झाली. आता आपण सनीच्या पूर्ण कुटुंबाविषयी जाणून घेणार आहोत. तुम्हाला सांगू इच्छितो की, सनीचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. अवघ्या २ महिन्यात त्याचा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

धर्मेंद्र याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा सनी आहे. प्रकाश कौर असं त्यांच नाव आहे. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं आहे. त्याही मथुरा येथून भाजपाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश यांची एकूण चार मुले आहेत. सनी देओल, बॉब देओल, विजेता देओल, अजिता देओल अशी त्यांची नावे आहेत. अजिता आणि विजेता या दोन्ही सनीच्या बहिणी अमेरिकेत वास्तव्यास आहेत. धर्मेंद्र आणि हेमा यांनाही दोन मुली आहेत. ईशा देओल आणि अहाना देओल अशी त्यांची नावे आहेत.

दरम्यान सनी देओल यांची पत्नी सार्वजनिक ठिकाणी खूपच कमी दिसते. पूजा देओल असं सनीच्या पत्नीचं नाव आहे. सनीला दोन मुलं असून करण आणि राजवीर अशी त्यांची नावे आहेत. सनी आणि पूजा यांनी १९८४ मध्ये लग्न केलं होतं. करण देओल हा लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. पल पल दिल के पास या सिनेमातून करण डेब्यू करणार आहे. १९ जुलै रोजी करण देओलचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सनी देओलबाबत सांगायचे झाले तर, १९८३ मध्ये सनीने बेताब या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. सनीने बर्मिंघममध्ये अभिनयाचे धडे घेतले आहेत. सनीचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. ब्लँक या सिनेमातून सनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. करण कपाडिया हा डिंपल कपाडियाचा भाचा या सिनेमातून डेब्यू करणार आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like