Actress Janhvi Kapoor | जान्हवी कपूर व वरुण धवन यांची लवस्टोरी असलेल्या ‘बवाल’ चित्रपटाचा टीझर आऊट; प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री जान्हवी कपूर (Actress Janhvi Kapoor) व अभिनेता वरुण धवन (Actor Varun Dhawan) हे लवकरच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. बहुचर्चित बवाल चित्रपटात (Bawal Movie) जान्हवी व वरुण यांची रोमॅंटिंक जोडी दिसणार आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून त्यांच्या चाहत्यांना चित्रपटाची प्रतीक्षा होती. आता बवाल चित्रपटाचा टीझर व रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. (Actress Janhvi Kapoor) सोशल मीडियावर बवाल चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

पहिल्यांदाच प्रेक्षकांना जान्हवी कपूर व वरुण धवन हे कपल म्हणून पाहता येणार आहे. बवाल या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. दिग्दर्शन नितेश तिवारी यांचे छिछोरे, दंगल व भूतनाथ रिर्टन हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरले होते. आता ते बवाल हा जबरदस्त लव्ह स्टोरी असलेला सिनेमा घेऊन येत आहेत. हा सिनेमा अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या 21 जुलैला प्रदर्शित होणार आहे. (Bawal Movie Release Date) ‘बवाल’ चित्रपटाच्या टीझरनेच (Bawal Movie Teaser) प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असून यामध्ये सुरुवातीलाच जान्हवी कपूर रेड कलरच्या गाऊनमध्ये वरुण धवनला सरप्राईज देताना दिसत आहे. सुरुवातीला या दोघांमध्ये प्रेम निर्माण होते, मात्र ते ओळखण्यासाठी ते उशीर करतात. ज्यावेळी त्यांना प्रेमाची जाणीव होते तेव्हा मात्र उशीर झाला असल्याचे टीझरमधून कळतं आहे. प्रत्येक प्रेम कहानीची एक लढाई असते असे या टीझरमध्ये सांगण्यात आले असून त्यामधील शेवटचे क्षण प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहेत.

‘बवाल’ चित्रपटाचे निर्माते चित्रपटाला जागतिक स्तरावर आणण्याच्या विचारात असून त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर रिलीजचा (Bawal Movie Trailer) मोठा इव्हेंट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या 8 जुलैला दुबईमध्ये बवाल चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज इव्हेंट पार पडणार असून वरुण धवन व जान्हवी कपूर (Actress Janhvi Kapoor) यावेळेस उपस्थित राहणार आहेत. सध्या ते शुटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी असून 8 तारखेला दुबईमध्ये (Dubai) हजर राहणार आहे.

Web Title :  Actress Janhvi Kapoor | janhvi kapoor and varun dhawan bawaal teaser release movie streams on 21st july

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांचे श्रमदान, चाँदसैली घाटाने घेतला मोकळा श्वास

Maharashtra Municipal Elections | विरोधकांची ताकद दुभागल्याने ऑक्टोबरमध्ये महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता

Pune PMC News | समाविष्ट 34 गावांतील विकासकामांचा अहवाल तयार करण्याच्या समितीमध्ये 12 जणांना संधी मिळणार

Maharashtra Political Crisis | ‘शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात, कारण…’, भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Political Crisis | शिंदे गटात नाराजी, विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं; बच्चू कडूंनी बोलून दाखवली खदखद