Actress Kajol | “एवढा वेळ मग तुम्ही काय करत होते?”, अभिनेत्री काजोल पापाराझींवर भडकली

पोलीसनामा ऑनलाइन – अनेक दशकांपासून बॉलीवुडमध्ये आपली स्वतंत्र ओळख जपणारी अभिनेत्री काजोल (Actress Kajol) पुन्हा लाईमलाईटमध्ये आली आहे. काजोलने आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील दमदार पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘लस्ट स्टोरीज 2’ ओटीटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यानंतर आता काजोलची ‘द ट्रायल’ (The Trial) ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या काजोल याच सिरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान काजोल (Actress Kajol) पापाराझींवर नाराज झालेली दिसून आली. एवढा वेळ काय करत होते ? असा प्रश्न तिने पापाराझींना केला.

अभिनेत्री काजोल ही गेली दोन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काजोलच्या निखळ हास्याचे व जीवंत अभिनयाचे अनेक लोक चाहते आहेत. सोशल मीडियावरही काजोलच्या अपडेट जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात. (Kajol With Paparazzi) पापाराझीही काजोलच्या मोमेंट कॅप्चर करत असतात. काजोल एका इव्हेंटमध्ये तिच्या आगामी सिरिजच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी तिने मनमोहक अशा केसरी रंगांचा पॅन्ट सूट परिधान केला होता. यावेळी तिने केस मोकळे सोडून व पिंक कलरचे हाय हिल्स घालून लूक पूर्ण केला होता. काजोलच्या हा अनोखा फॉर्मल लूकचे कौतुक होत आहे. मात्र या दरम्यान तिची आणि पापाराझींची जरा चकमक झाली.

पापाराझींना फोटो काढण्यासाठी काजोलने छान अशा पोज दिल्या. ती हसून सर्वांना पोज देत होती. त्यानंतर ती तिथून निघत असताना एका मुलीने तिला सांगितले की काही पापाराझींचे फोटो काढायचे राहिले आहे. यावर अभिनेत्री काजोल चिडली व ‘एवढ्या वेळ करत काय होते तुम्ही लोक ?”, असा प्रश्न तिने केला. पण त्यानंतर काजोल पुन्हा जागेवर आली व कॅमेऱ्यासाठी पोज देऊ लागली. काजोलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री काजोल (Actress Kajol) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तिचे आगामी चित्रपट व तिची वक्तव्य यामुळे ती लाईमलाईटमध्ये आहे. या आधी आलेला तिचा ओटीटीवरील सिनेमा ‘लस्ट स्टोरीज् 2’ (Lust Stories 2) चांगलाच गाजला होता. यामध्ये काजोलने दिलेल्या बोल्ड सीनमुळे (Kajol Bold Photo) ट्रोल देखील करण्यात आले होते. आता काजोलची नवी सिरिज येत असून ‘द ट्रायल’ मध्ये काजोल वकिलांच्या भूमिकेत दिसणार आहे.(The Trial Release Date) येत्या 14 जुलैला सिरिजचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title :  Actress Kajol | kajol gets angry on paparazzi when asked to pose again says itni der se kay kar rahe the tum log

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा