अभिनेत्री नेहा पेंडसे लग्नापूर्वी ‘या’ व्यक्तीसोबत रहात होती ‘लिव्ह-इन’मध्ये ! केला ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री नेहा पेंडसे आजवर आपल्या बोल्डनेसमुळं कायमच चर्चेत येत असते. जानेवारीत नेहा शार्दुल सिंह बयाससोबत विवाहबद्ध झाली होती. यावेळी दोन लग्न झालेल्या शार्दुलसोबत लग्न केल्यानं नेहा खूपच ट्रोल झाली हेती. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत नेहानं आता ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि एक मोठा खुलासा केला आहे जो कदाचितच कोणाला माहिती असेल.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नेहा म्हणाली, “लग्नापूर्वी मी आणि शार्दुल लिव्ह इनमध्ये रहात होतो हे फार कमी जणांना माहिती आहे. दोघांच्याही सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी एकमेकांना काळव्यात, समजाव्यात हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळं मला त्याच्या त्रासदायक सवयीसुद्धा माहिती आहेत.”

View this post on Instagram

Tell me your Dreams🖤

A post shared by Neha Pendse (@neha.pendse) on

पुढे बोलताना नेहा म्हणाली, “लग्नानंतर मला खूप वाईट पद्धतीनं ट्रोल करण्यात आलं. सत्य परिस्थिती माहिती नसतानाही लोक टीका करतात याच मला खूप वाईट वाटतं. ज्यांच्या आयुष्यात काहीच राहिलेलं नसतं ते इतरांवर टीका करतात, त्यांना ट्रोल करतात. यातून त्यांना आनंद मिळतो. मी माझ्या आयुष्यात कधीच इतकी ट्रोल झाले नसेल. परंतु मला आता या ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही.”

View this post on Instagram

Rate the Figure🔥in Comment

A post shared by Neha Pendse (@neha.pendse) on

View this post on Instagram

🖤🔥

A post shared by Neha Pendse (@neha.pendse) on

You might also like