तुरुंगातील ‘या’ अभिनेत्यांवरुन दोन अभिनेत्रीमध्ये रंगल Twitter war, ती म्हणाली – ‘तुला का मिर्ची लागली?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागीन फेम अभिनेता पर्ल व्ही. पुरी (Pearl V Puri) याला एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणावरुन अभिनेत्री Actress देवोलिना भट्टाचार्जी आणि निया शर्मा यांच्यात ट्विटर वॉर रंगल आहे. एकिकडे नियानं जाहीररित्या पर्लला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे देवोलिना मात्र त्याला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींवर टीका केली आहे. केलेल्या कर्माची फळ इथेच भोगावी लागतात असा जोरदार टोला तिने लगावला आहे. या दोन्ही अभिनेत्रीचे Actress ट्विट्स सध्या सर्वत्र चर्चेत आहेत.

सोशल मीडियावरील आवाज त्याला कुठल्याही प्रकराची मदत करु शकणार नाही.

तुम्ही एका लहान मुलीवर आरोप करत असून तुम्हाला तुमच्या कर्माची फळ भोगावीच लागतील.
किती विचित्र लोक आहात तुम्ही सगळे. विरोध करायचा असेल तर आंदोलन करा.
उपोषण करा पण इथ सोशल मीडियावर अशी दुर्गंधी पसरवू नका, अशा आशयाचे ट्विट अभिनेत्री Actress देवोलिना हिने केले होते.
यावर नियान ताईला कोणीतरी सांगा उपोषण किंवा कँडल मार्च काढण्यासाठी सध्या परवानगी मिळणार नाही.
देशात सध्या कोरोनाचे संकट आहे.

https://twitter.com/Theniasharma/status/1401912261627756545?s=20

शिवाय ताईला डान्स रिल शेअर करण्यापूर्वी सराव करण्याची गरज आहे.
सध्या तू त्याच्यावरच लक्ष केंद्रित कर, अशा आशयाचे ट्विट करून प्रत्युत्तर दिले होते.
मात्र तिचे हे ट्विट पाहून देवोलिना आणखी संतापली.
तिने माझे सर्व ट्विट्स त्या सात वर्षांच्या मुलीला ट्रोल करणाऱ्यांविरोधात होते.
जे त्या लहान मुलीला गोल्ड डिगर म्हणत आहेत.
तुला मिरची का लागली? तुला खरच या प्रकरणातील काही माहिती आहे की उगाच अर्धवट माहितीच्या आधारावर ट्विट करतेस.
अशा आशयाची 2 ट्विट करून नियाचा समाचार घेतला आहे.

Pune Education News | RTE 25 % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार पासून सुरु, पालकांना मिळणार 20 दिवसांचा कालावधी

अवघ्या 20 हजारात 1 वर्षाच्या वॉरंटीसह खरेदी करा, 90kmpl मायलेजची Bajaj CT 100

Dr. Swapna Patkar | बोगस पदवी प्रकरणात डॉ. स्वप्ना पाटकर यांना वांद्रे पोलिसांकडून अटक

काय सांगता ! होय, बारामतीच्या चहावाल्याने थेट पंतप्रधानांना पाठवली 100 रूपयांची मनी ऑर्डर, म्हणाले – ‘मोदीजी दाढी करा’

Wab Title : Actress nia sharma and devoleena bhattacharjee fight over pearl puri rape case