Actress Priyanka Chopra | “भारतीय चित्रपट हे हिप्स आणि बुब्स…” अभिनेत्री प्रियांका चोप्राचा बॉलीवुडवर गंभीर आरोप

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Actress Priyanka Chopra) ही आता आंतरराष्ट्रीय स्तरावरीव प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवुडपासून सिनेविश्वात पदार्पण केले व त्यानंतर एका मागून एक हिट चित्रपट तिने दिले. आजही बॉलीवुडच्या टॉपच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्राचे (Actress Priyanka Chopra) नाव अग्रहाने घेतले जाते. मात्र तिचा बॉलीवुडवर आरोप करणारा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये तिने बॉलीवुड सिनेविश्वावर गंभीर आरोप केले आहेत तर तिचा हा व्हिडिओ (Priyanka Chopra Trolling) पाहून नेटकरी प्रियांका चोप्राला ट्रोल करत आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने 2016 साली 68 व्या एमी पुरस्कार सोहळ्यादरम्यान (Emmy Awards) एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय चित्रपटांबाबत गंभीर वक्तव्य केले होते. यामध्ये प्रियांका बॉलीवुडच्या काही हुक स्टेप करुन दाखवत म्हणते आहे की, “भारतीय चित्रपट हे हिप्स आणि बुब्सबद्दल असतात”. तिच्या या गंभीर आरोपांमुळे तिला तेव्हा ही ट्रोल करण्यात आले होते. आता ही व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत असून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. ट्रोलर्स याला प्रियांकाचे लाजिरवाणे कृत्य म्हणत असून तिला खरी ओळख बॉलीवुडनेच निर्माण करुन दिली आहे अशा शब्दांत नेटकरी व्यक्त होत आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Actress Priyanka Chopra) 2002 साली हिरो चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. (Priyanka Chopra Bollywood Debut) त्यानंतर तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. त्यानंतर तिने 2017 साली बेवॉच या चित्रपटातून तिने हॉलीवुड विश्वात पदार्पण केले. (Priyanka Chopra Hollywood Debut) त्यानंतर तिने हॉलीवुड इन्स्ट्रीही गाजवली. प्रियांकाने निक्स जोनस (Nick Jonas) सोबत 2018 साली विवाह केला व ती युएसमध्ये स्थायिक झाली. अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या सिटाडेल (Citadel) या मालिकेमुळे चर्चेत आहे.

https://www.instagram.com/p/CpmNiCZoQSH/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Web Title :  Actress Priyanka Chopra | priyanka chopra getting troll for her old statement about indian films

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांचे श्रमदान, चाँदसैली घाटाने घेतला मोकळा श्वास

Maharashtra Municipal Elections | विरोधकांची ताकद दुभागल्याने ऑक्टोबरमध्ये महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता

Pune PMC News | समाविष्ट 34 गावांतील विकासकामांचा अहवाल तयार करण्याच्या समितीमध्ये 12 जणांना संधी मिळणार

Maharashtra Political Crisis | ‘शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात, कारण…’, भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Political Crisis | शिंदे गटात नाराजी, विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं; बच्चू कडूंनी बोलून दाखवली खदखद