Actress Shraddha Kapoor | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील ‘त्या’ निर्णयावर श्रद्धा कपूरचा बदाम दाखवत थर्ड अंपायरला टोला

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूडमध्ये अनेक हीट चित्रपट देणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Actress Shraddha Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे व सोशल मीडियामुळे कायम चर्चेत असते. अभिनयाच्या बळावर बॉलीवुडमध्ये (Bollywood) आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी श्रद्धा कपूर ही अनेकदा तिचे मत स्पष्टपणे मांडताना दिसते. कोणाचेही मन दुखावता आपले मत मांडण्याची श्रद्धाची ही शैली अनेकांना भावते. तिने नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवर एक क्रिकेट बद्दल कमेंट केली आहे. (Actress Shraddha Kapoor)

भारत आणि ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (IND VS AUS WTC Final) मॅचमध्ये भारताचा दारुण पराभव झाला.
भारताला ऑस्ट्रेलियाने (IND VS AUS) 209 धावांनी पराभूत केले. या फायनल मॅचच्या चर्चा सोशल मीडियावर फार गाजल्या.
या फायनल मधील थर्ड अंपायरच्या (WTC Final Third Umpire Decision) एका निर्णयावर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे टीका केली.
या सामन्यामध्ये फलंदाज शुबमन गिल (Batsman Shubman Gill) याचा आउट झाल्यानंतर खूपच गोंधळ उडालेला दिसला.
त्याची विकेट गेली तो चेंडू फिल्डरने कॅच पकडण्यापूर्वी थोडासा गवताला स्पर्श झाला होता.
असं असतानाही थर्ड अंपायरने शुबमनला आउट घोषित केलं. (Shubman Gill WTC Final Out) यामुळे थर्ड अंपायरवर टीकेची झोड उठवली गेली. यावर आता अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही स्टोरी पोस्ट करत अंपायरला टोला लगावला.

आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरून श्रद्धा कपूरने हातात काही बदाम घेतल्याचा फोटो स्टोरीवर पोस्ट केला.
ज्यामध्ये तिने थर्ड अंपायरला बदाम ऑफर केले आणि त्याने दिलेल्या निर्णयाबद्दल टोला लगावला.
या फोटोला श्रद्धाने “मी थर्ड अंपायरला बदाम ऑफर करताना” असे कॅप्शन दिले आहे.

श्रद्धा कपूरचे (Actress Shraddha Kapoor) क्रिकेट प्रेम तर सर्वश्रूत आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर क्रिकेटचे सामने पाहत असलेले फोटो टाकत असते व क्रिकेटवर आपले मत देखील मांडत असते.
श्रद्धाने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचवर टीप्पणी केली आहे.
वर्कफ्रन्ट बद्दल बोलायचं झालं तर श्रद्धा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
काही महिन्यांपूर्वी तिचा ‘तू झुठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

Web Title :   Actress Shraddha Kapoor | shraddha kapoor offered almond to third umpire india vs australia wtc final 2023 match

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS MLA Raju Patil | ‘ही तर भाजप शिंदे गटाची खेळी’, कल्याण लोकसभा जागेच्या वादावरुन मनसेने काढला चिमटा; म्हणाले – ‘ही मंडळी पुन्हा…’

Maharashtra Politics News | वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

Hruta Durgule | अभिनेत्री ऋता दुर्गुळे पडली होती सहकलाकाराच्या प्रेमात; मुलाखतीमध्ये केले कबुल