#MeToo मुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता लोकसभा निवडणूक ‘या’ जागेवरून लढवणार

झारखंड : वृत्तसंस्था – अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि आसावरी जोशी नंतर अजून एक अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी ईशा कोप्पीकरने भाजपात तर आसावरी जोशी यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केले होता. आता लवकरच  झारखंडच्या जमशेदपूर लोकसभा जागेवरून बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

झारखंडच्या पीपुल्स पार्टीच्या सुप्रीमो सूर्य सिंह बेसरा यांनी दिलेल्या माहितीमध्ये झारखंडमध्ये जनताच्या बॅनरखाली १४ वेगवेगळ्या संघटना एकत्रित आहेत ज्या लोकसभा जागा लढणार आहे. या १४ जागांमध्ये तनुश्री दत्तला जमशेदपूरची जागा देण्याचा विचार करण्यात आला आहे. पण याबाबत तनुश्री दत्ताने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

याबाबत सुप्रीमो सूर्य सिंह बेसरा यांनी माहिती देत सांगितले, जमशेदपूर लोकसभा जागेसाठी तनुश्री दत्ताशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे. तनुश्री यांच्या वडिलांकडून यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे तनुश्री देखील यावर सकारात्मक निर्णय देतील असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

झारखंडमध्ये सध्या सगळेच राजकीय पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. अशाच श्रेत्रीय पार्टी झारखंड पीपुल्स पार्टीच्या सुप्रीमो सूर्य सिंह बेसरा यांनी पार्टीच्या रणनीतिचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, जेएमएम, उलगुलान झारखंड पक्ष, होरो राष्ट्रीय सेंगेल पक्ष, तृणमूल काँग्रेस एमसीसी, सीपीआय, सीपीएम, सीपीएमएल, आम आदमी पार्टी, बहुजन मुक्ति पार्टी, बहुजन समाज पार्टी, अशा १४ संघटनाने  मिळून भाजप सरकारला हारवण्याचं ठरवलं आहे.