काँग्रेसचा मोठा डाव : लोकसभा नेतेपदी बंगालमधील ‘हा’ बडा नेता ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून संसदीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज संसदेत सर्व खासदारांची ओळख करून देण्यात येणार असून प्रत्यक्ष कामकाजाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. आज लोकसभेच्या हंगामी अध्यक्षाची निवड करण्यात आली असून काँग्रेस देखील आपल्या लोकसभेतील नेतेपदाची निवड करण्यासाठी घाई करत असून मनीष तिवारी, शशि थरूर आणि अधीर रंजन चौधरी या तिघांचे नाव या पदासाठी आघाडीवर असून त्यातील अधीर रंजन चौधरी यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याची माहिती मिळत आहे.

मनीष तिवारी हे माजी केंद्रीय मंत्री असून त्यांना लोकसभेचा अनुभव देखील आहे. ते दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले आहेत. शशी थरूर हे देखील काँग्रेसचा एक स्वच्छ चेहरा असून ते या पदासाठी योग्य असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल मधील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सलग पाचव्यांदा संसदेत गेलेले अधीर रंजन चौधरी हे देखील या पदासाठी सर्वात जास्त पात्र असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे. या सगळ्यात काँग्रेस आता स्थानिक आणि तळागाळातील नेत्यांना आपण संधी देणार असल्याचा संदेश देखील या निर्णयातून देत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सर्व सदस्यांमध्ये अधीर रंजन चौधरी हे अनुभवी आणो योग्य उमेदवार असल्याने त्यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. त्याच बरोबर रविवारी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसने आपला प्रतिनिधी म्हणून अधीर रंजन चौधरी यांना पाठवले होते, त्यामुळे त्यांचे नाव निश्चित असल्याचे समजते.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

Loading...
You might also like