रणबीर कपूरपेक्षाही ‘या’ अभिनेत्याला हँडसम मानते आलिया भट्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या बॉलिवूडमधील सर्वात लविंग कपलमधील एक आहे. दोघेही एकमेकांना पसंत करतात. आलियाला रणबीर किती आवडतो हे आलियाने अनेकदा बोलून दाखवले आहे. भलेही आलिया सध्या रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे परंतु ती रणबीरपेक्षा आणखी कोणाला तरी जास्त हँडसम मानते.

स्टुडेंट ऑफ द ईयर 2 मध्ये निगेटीव्ह रोल करणारा अभिनेता आदित्य सील याने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर रणबीर कपूर आणि त्याचा एक फोटो शेअर केला. त्यात ते दोघेही फुटबॉल खेळताना दिसत आहेत. आदित्यच्या या फोटोवर चाहत्यांनी चांगलाच कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याच्या फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक मिळाले आहेत.

आदित्यचा फोटो लाईक केल्यानंतर अनेकांनी आदित्यच्या गुड लुकचे कौतुक केले. अशातच एका युजरने कमेंट  केली की, माझ्या मेत आदित्य सील हा रणबीर कपूरपेक्षा जास्त हँडसम आहे. परंतु चकित करणारी गोष्ट ही आहे की, आलियाने या कमेंटला लाईक केलं आहे. म्हणजेच त्या युजरच्या कमेंटला आलियाचीही सहमती आहे. रणबीर कपूरपेक्षा आदित्य सील जास्त हँडसम आहे असं आलियाही मानते आहे.