Aditya Thackeray | ‘बाळासाहेबांचा सन्मान’ म्हणत नोटीस न बजावणार्‍या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aditya Thackeray | शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट एकीकडे शिवसेनेवर (Shivsena) आपला हक्क सांगत आहे तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि एकुणच ठाकरे कुटुंबियांवर आपली निष्ठा असल्याचेही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्लीत असताना आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आम्ही शिवसेनेशी युती केल्याचे म्हटले. यापूर्वी शिंदे गटाने व्हीप देखील बजावला आहे. मात्र यातून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना वगळण्यात आले होते. यावरून आता आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावले आहे.

 

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 14 आमदारांवर अपात्रतेची कारवाईची करण्याची मागणी करणारी याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. परंतु या 14 आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचे नाव वगळण्यात आले आहे. बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचे नाव दिलेले नाही, असे भरत गोगावले यांनी सांगितले होते. (Aditya Thackeray)

या संदर्भात आज पत्रकारांशी बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांनी उगाचच माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नाही, नाहीतर खंजीर खुपसण्याचे कारण नव्हते. शिवसेनेचे चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन सुरू आहे. आदित्य ठाकरे आज या आंदोलनात सहभागी झाले होते.

 

आदित्य ठाकरे म्हणाले, आरे जंगल असून हा फक्त झाडांचा प्रश्न नाही, येथे अनेक प्राणी येतात. सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईच्या विरोधात होता. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका हेच सांगणे आहे. हा द्वेष, अहंकार किंवा मुंबईवरचा राग असावा.

मुंबईने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. आरेवरील, मुंबईवरील आमचे प्रेम यावर राग ठेवूनच हा निर्णय घेतलाय का हा प्रश्न आहे.
हे सरकार स्थगिती सरकार होणार का? स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेचे नुकसान होणार आहे याबद्दल विचार करावा लागेल.
सरकार बदलले म्हणून स्थगिती देणे हे योग्य नाही, असे आदित्य म्हणाले.

 

Web Title :- Aditya Thackeray | shivsena mla aditya uddhav thackeray whip cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा