Pune Crime | थेऊरमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीच्या खून प्रकरणाचा पर्दाफाश; लोणीकाळभोर पोलिसांकडून तरूणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पाच दिवसांपूर्वी थेऊर (Theur) येथील चिंतामणी हायस्कूलसमोर (Chintamani High School) यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या (Yashwant Sahakari Sakhar Karkhana) आवारात खून करून टाकून दिलेला एका तरुणीचा (Murder Of Girl) मृतदेह सापडला होता. मृत तरूणीची ओळख पटली असून खूनाचा तपास करणार्‍या तरूणाला लोणी काळभोर पोलिसांनी (Lonikalbhor Police) अटक केल्याने अखेर खूनाचा उलगडा झाला आहे.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महेश पंडीत चौगुले Mahesh Pandit Chowgule (वय 24 सध्या, रा. तळेगाव दाभाडे – Talegaon Dabhade, मूळ चिवरी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद – Osmanabad) असून तो मृत तरूणी वैशाली लाडप्पा दुधवाले Vaishali Ladappa Dudhwale (सध्या रा. भीमा कोरेगाव – Bhima Koregaon, मूळ चिवरी, ता. उमरगा, जि.उस्मानाबाद) हिचा प्रियकर आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्याने वैशालीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. (Pune Crime)

 

आरोपी चौगुले हा तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. वैशाली केअरटेकर म्हणून काम करत होती. दोघे एकाच गावातील असल्याने ते एकमेकांना ओळखत होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते.

 

तरुणीचा मृतदेह 5 जुलैरोजी सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासात तिचे नाव समजल्यानंतर पोलिसांनी वैशालीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.
वैशालीच्या आईची चौकशी केली असता आरोपी महेश चौगुले याच्यासोबत वैशालीचे प्रेमसंबंध असल्याचे समजले.

 

पोलिसांनी चौगुले तपास करून त्याला तळेगाव दाभाडे परिसरात पकडून ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने चारित्र्याच्या संशयातून वैशालीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi),
उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore), राजेश दराडे, गणेश भापकर, निखिल पवार, मल्हारी ढमढेरे आदींनी ही कारवाई केली.

 

Web Title :- Pune Crime | unravel the murder case of a woman found dead in theur pune lonikalbhor police arrest youth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा