मला शेतीमधील काही कळत नाही पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- मला शेतीमधील काही कळत नाही पण मला शेतकऱ्यांचे दु:ख कळते. देशासमोर दहशतवाद आणि राज्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असल्याचे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.

आंबेगाव खुर्द – जांभूळ वाडी येथील तलावाचे सुशोभीकरण, जाँगिंग ट्रेक आणि इतर विकास कामांचे भुमीपुजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावर ते बोलत होते. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार भीमराव तापकीर, डॉ. नीलम गोर्हे , शहर प्रमुख महादेव बाबर,चंद्रकांत मोकाटे,राजेंद्र काळे, रमेश कोंडे आदी उपस्थित होते.

पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भाग आणि हवेली तालुक्यातील शहरी भाग असा समावेश असलेल्या विधानसभा मतदारसंघात शिवतारे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करीत ठाकरे म्हणाले ,”आमचे दीडशे आमदार निवडून आल्यानंतर त्यांना विकास काय असतो याचा अभ्यास करण्यासाठी या मतदारसंघात मी आणुन. त्यांना अभ्यास करायला सांगेन. “सोलापूर जिल्ह्यातील पोखरापूर गावातील प्रलंबित पाण्याचा प्रकल्प आणि कोकणातील जयगड येथील रस्त्याचा प्रश्न मार्गे लावण्याची उदाहरणं देत ठाकरे म्हणाले,” शिवसेना हा जनसेवा करणारा पक्ष आहे. सत्तेत असेल तर लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जातो.

विरोधात असताना आंदोलनाला लाठ्या काठ्या खाऊन काम पुर्ण करण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करतो. निवडणुका येतात आणि निवडणुका जातात. काही लोक निवडणुका आल्या की दिसू लागतात. परंतु शिवसेनेच्या दृष्टिकोनातून जी मधली पाच वर्षे असतात त्याला महत्व दिले जाते .या कालावधीत जनसेवा करून वचनपुर्ती करण्यासाठी कामे मार्गी लावणे याचाच प्रयत्न केला जातो. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा विचार दिला. हा विचार पुढे घेऊन जायचं आहे. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडे विकासाचा दृष्टिकोन आहे हे शिवतारे यांच्या कार्यातून दिसून येत आहे.”

पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत असलेला शेतकरी या दोन्हींचा संदर्भ घेत त्यांनी देश आणि राज्या समोर उभ्या असलेले आव्हान काय आहे हे देखील स्पष्ट केले.