नकली जिर्‍यामुळं होवू शकतो ‘कॅन्सर’ अन् ‘स्टोन’चा धोका, जाणून घ्या कसं ओळखायचं ते

पोलीसनामा ऑनलाइन – दूध, खवा, मिठाई आणि मसाले अशा अनेक गोष्टींमध्ये आपण भेसळ झालेली पाहिली आहे. मात्र, अलीकडे राजस्थान आणि गुजरात राज्यात नकली जिऱ्याचा धंदा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो आहे. हे जिरं जंगली गवत, गुळाचं पाणी दगडांची पावडर मिसळून तयार केलं जात. जे आरोग्यसाठी नुकसानदायी ठरु शकतं. नकली जिऱ्याचा सेवनाने स्टोनचे नव्हे तर याचे सातत्याने सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती सुद्धा कमजोर होण्यास सुरुवात होते. कॅन्सरचाही धोका उद्भवू शकतो.

यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले की, नकली जिऱ्याची भेसळ फार घातक आहे आणि सामान्य नागरिकांच्या जीवाबरोबर हा खेळ झाला आहे. ज्या प्रकारे हे जिरं तयार केलं जात, त्यात ज्या गोष्टी मिसळण्यात येतात त्याने स्टोनचा धोका अधिक आहे. तसेच रोगासोबत लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होते. मनुष्याचं शरीर भेसळयुक्त पदार्थ खाण्यासाठी तयार झालेलं नसते. या जिऱ्याने कॅन्सर आणि त्वचेबाबत आजारही निर्माण होऊ शकतात.

कशा पद्धतीने तयार केलं जात हे जिरं?

त्यासाठी एक खास प्रकारचे गवत वापरण्यात येत. ते गुळाच्या पाण्यात मिक्स करुन सुखवलं जाते. त्याने गवताला जिऱ्याचा रंग प्राप्त होतो. त्यानंतर जिऱ्याला चमक आणि ठोस करण्यासाठी त्यात दगडाची पावडर मिक्स करण्यात येते. खूप महिन्यांपासून हा काळा धंदा गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये सुरु आहे. येथूनच देशातील विविध भागात हे जिरं पाठवलं जाते.

कसे ओळखलं नकली जिरे?

नकली जिरं ओळखण्यासाठी एक वाटीत पाणी घ्या. पाण्यात हे जिरं टाकल्यानंतर काही वेळात ते विरघळून जाते. त्याचा रंग बदलतो. तसेच ओरिजनल जिरं पाण्यात टाकल्यावर विरघळत नाही.