फक्त 13 मिनीटांमध्ये तपासा दूध ‘ताजं’ की ‘शिळं’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी दूधाचा ताजेपणा समजून घेण्यासाठी एक सोपी टेस्ट शोधून काढली आहे. या टेस्टमध्ये 13 मिनिटात लक्षात येते की दूध ताजे आहे की नाही. दूधात बॅक्टेरिया आहे की नाही, यावरुन त्याचा ताजेपणा लक्षात येतो. पेपर सेंसरवर आधारित नव्या किटच्या माध्यमातून समजते की दूधात बॅक्टेरिया आहे किंवा कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत किंवा नाही. जर दुधात बॅक्टेरिया असेल तर रंगात बदल होईल. हे कीट लवकरच बाजारात आणण्यात येईल.

दूधाची गुणवत्ता खराब
दुधात घातक पदार्थ मिसळून विकण्याच्या घटना वाढताना दिसत आहे. परंतू दुधाची गुणवत्ता अनेक कारणांनी खराब होते. एका रिपोर्टनुसार देशात विकण्यात येणाऱ्या दूधातील 41 टक्के गुणवत्ता चांगली नसते. दूधाच्या गुणवत्तेत येणारी कमी ही पाण्याची भेसळ करणे, फॅट किंवा साखर मिसळणे यामुळे होते. सर्वात चिंतेची बाब म्हणजे दूधात फॅट मिसळण्याचे प्रकार मोठमोठ्या कंपन्याद्वारे देखील केले जातात. हे दूध हदयाच्या रुग्णांसाठी आणि जाडेपणा असलेल्या लोकांसाठी नुकसानकारक आहे.

घर बसल्या करा दूधाच्या गुणवत्तेची तपासणी 

1. थोडे दूध घ्या आणि तेवढेच पाणी घ्या.
2. दूध आणि पाणी दोन्ही ढवळून घ्या.
3. आता ते ढवळल्यावर लक्षात येईल की जर त्यात डिटर्जेंट मिसळले असेल तर जास्त फेस दिसेल आणि हा फेस प्रकाशात नीट पाहिला तर दिसले की हो यातील बुडबुडे मोठे असतील आणि रंग असलेले दिसतील.

Visit : Policenama.com