ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुण्यात देखील गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका वृत्तवाहिणीवर चर्चा सुरू असताना त्यात छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्या विषयी अपशब्द उच्चरल्याप्रकरणी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात संताप व्यक्त केला जात असून, ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अमर पवार (वय 35, चंद्रभागानगर, भारती विद्यापीठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 153, अ, ब. 504, 295 अ, 500/2 या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात आहे. त्यात सरकार प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होतात. सध्या राज्यात मराठा आंदोलन सुरू आहेत. यादरम्यान एका वृत्तवाहिणीवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार संभाजीराजे भोसले यांच्या बाबत अपशब्द वापरले. त्यानंतर राज्यात मराठा समाजाने याविरोधात आंदोलन करत तीव्र संपात व्यक्त करत ठिकठिकाणी निदर्शने केली. फिर्यादी यांनी ऍड. सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली होती. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.