वजन नियंत्रित ठेवण्यासाठी करा पिस्त्याचं सेवन, जाणून घ्या इतर फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  हिवाळ्यात पिस्ता खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. घरातील वडीलधाऱ्यानी मुलांना पिस्ता खाण्याचा सल्ला दिला असेल. पिस्ता उष्ण आहे, म्हणून हिवाळ्यात सेवन केले पाहिजे. पिस्ता खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं; कारण त्यात फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन-सी, जस्त, तांबे, लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. हेच कारण आहे की हा रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवतो आणि इतर रोग आपल्यापासून दूर ठेवतो. हिवाळ्यात पिस्ता खाण्याचे फायदे काय आहेत?

केसांसाठी पोषक

हिवाळ्यात केस खराब होतात. थंड वाऱ्यांमुळे केस खडबडीत होऊ लागतात, त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. केसांची चमक नाहीशी होते त्यामुळे पिस्ता खाणे फार महत्त्वाचे आहे. केस खराब असतील तर पिस्ता पेस्ट बनवा आणि केसांवर लावा. असे केल्याने तुमचे केस लवकरच खूप चमकदार आणि निरोगी दिसतील.

हृदयरोग्यांसाठी फायदेशीर

पिस्ता सेवन केल्याने हृदयरोग्यांना मोठा फायदा होतो. हृदयाच्या रुग्णांना हिवाळ्याच्या काळात स्वत:ची काळजी घ्यावी लागते. पिस्ता खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यासाठी मदत करतो. म्हणून, हृदयरोग्यांनी त्यास आपल्या आहारात समाविष्ट केला पाहिजे.

वजन नियंत्रित राहते

हिवाळ्याला आरोग्याचा ऋतू म्हणतात. त्यामुळे या हंगामात सर्वजण चांगले खातात. यामुळे अनेकदा लोक अधिक खाऊ लागतात आणि वजन वाढू लागते. अशा परिस्थितीत त्यांना आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात पिस्ता समावेश केला पाहिजे. पिस्ता खाल्ल्याने फार काळ भूक लागली आहे असे वाटत नाही आणि तुमचे पोटही भरलेले असते. पिस्ता हा कॅलरीज आणि उच्च प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर करायला हरकत नाही

अपचनाची समस्या

पिस्ता नियमितपणे खाल्ल्याने पचनसंस्था चांगली राहते. कारण, पिस्ता निरोगी जीवाणूंची वाढ करतो. अन्न पचण्यास मदत होते. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी ६, तांबे, मँगनीज, फॉस्फरस आणि थियामाइन सारखे आवश्यक पोषक घटक असतात. पिस्त्यामध्ये असलेल्या तंतूमुळे सहज उत्सर्जन होते आणि बद्धकोष्ठताही कमी होते.