43 वर्षानंतर 90 वर्षीय वृध्द महिलेची ‘Google-WhatsApp’ च्या मदतीनं कुटुंबाशी झाली भेट, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पंचुबाई चार दशकांपेक्षा अधिक काळापासून खान कुटुंबासमवेत अच्चन मावशी म्हणून राहिल्या पण या आठवड्यात त्या त्यांच्या नातवाला भेटल्या. पंचुबाई बरीच वर्षे दमोह जिल्ह्यातील कोटा ताल गावच्या इसरार खानबरोबर राहत होत्या. गेल्या महिन्यात इसरार यांना समजले की त्यांची अच्चन मावशी ही महाराष्ट्रातील आहे.

पंचुबाईंचे नातू पृथ्वी कुमार शिंदे हे त्यांच्या 90 वर्षांच्या आजीला घेऊन गेले आहेत. इसरारने गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने पंचुबाईच्या नातवाला शोधून काढले आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एका गावातून बुंदेलखंड प्रदेशातील दमोह पर्यंत सुमारे 500 कि.मी. अंतरापर्यंत पंचुबाई कशा पोहोचल्या हे कोणालाच माहिती नाही. खरं तर, खानच्या ट्रक चालक वडिलांनी पंचुबाईंना तेव्हा पाहिले जेव्हा मधमाश्यांच्या झुंडीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला होता. खान यांनी सांगितले की 43 वर्षांपूर्वी माझे वडील स्वर्गीय नूर खान जेव्हा त्यांच्या घरी जात होते तेव्हा त्यांनी पंचुबाईला त्रासदायक अवस्थेत पाहिले. मधमाशीच्या डंकांमुळे होणारी वेदना कमी करण्यासाठी त्यांनी त्यांना काही औषधी वनस्पती दिल्या.

खान यांनी सांगितले की, काही दिवसांनंतर त्यांच्या वडिलांनी तिला रस्त्याच्या कडेला पुन्हा पाहिले आणि तिचा ठावठिकाणा विचारला, पण ती काही बोलू शकली नाही, असे खानने सांगितले. त्यानंतर त्यांनी पंचुबाईस घरी आणले. तेव्हापासून ती आमची अच्चन मावशी बनली आणि संपूर्ण गावाची देखील अच्चन मावशी झाली. हे नाव माझ्या वडिलांनी दिले होते. ती अनेकदा मराठी बोलत असे. तिचे गाव शोधण्यासाठी माझ्या वडिलांनी आणि नंतर मी व माझ्या मित्रांनी खूप प्रयत्न केले परंतु आमचे प्रयत्न व्यर्थ ठरले कारण आम्हाला त्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही, विशेष म्हणजे ती काय म्हणत आहे हे आम्हाला समजू शकले नाही. 4 मे रोजी लॉकडाऊन दरम्यान खान कुटुंब एकत्र बसले होते. खानने मोबाईलवर मावशी जे बोलली ते रेकॉर्ड केले आणि त्यांना कळाले की मावशीने खानम नगर असे म्हटले आहे. नंतर, अमरावती जिल्ह्यात एक खानजम नगर पंचायत मिळाली. गुगलच्या मदतीने खानम नगरमधील अभिषेक नामक व्यक्तीचा मोबाइल नंबर मिळाला. मी त्यांच्याशी बोललो आणि गावात व आसपासच्या भागात व्हॉट्सअ‍ॅपवरुन मावशीचा फोटो प्रसारित करण्यास मदत मागितली. असे खान यांनी सांगितले.

जेव्हा अभिषेकने मला सांगितले की खेड्यातील एका कुटूंबाने मावशीची ओळख पंचुबाई म्हणून केली आहे आणि ती पृथ्वी कुमार शिंदे यांची आजी आहे, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. त्यानंतर शिंदे यांनी खानकडे संपर्क साधला. त्यांनी सांगितले की पंचुबाईंनी 2005 मध्ये तिचे पती तेजपाल यांना आणि तीन वर्षाआधी त्यांचा मुलगा भाईलाल यांना गमावले आहे. शिंदे यांनी सांगितले की माझे आजोबा तेजपाल आणि वडील भाईलाल यांनी आजीची भेट होण्याची आशा सोडली होती. माझ्या आजोबांनी पोलिस स्टेशनमध्ये आजीच्या हरवण्याची रिपोर्ट देखील नोंदविली होती.