लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनचा दावा

पोलिसनामा ऑनलाईन – लडाखनंतर चीनने आता भूतानमधील भूभागावर आपला दावा सांगितला आहे. ग्लोबल एन्वायरमेंटफॅसिलिटी कौन्सिलच्या 58 व्या बैठकीत चीनने भूतानमधील साकतेंग वन्यजीव अभयारण्याचा भूभाग वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. दरम्यान भूतानने चीनच्या या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध केला आणि तो भूतानचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले आहे.

चीनच्या दाव्याच्या विरोधात, वास्तविकता अशी आहे की मागील अनेक वर्षांमध्ये अभयारण्याच्या भूभागाबद्दल कधीही वाद झाला नव्हता. भूतान आणि चीन दरम्यान कोणतेही सीमांकन झालेले नाही. चीनच्या या कृतीचा भूतानने कडाडून विरोध केला आहे, साकतेंग वन्यजीव अभयारण्य भूतानचा अविभाज्य व सार्वभौम भूभाग आहे, असे म्हटले आहे. संपूर्ण वादातील एक महत्त्वाची बाब म्हणजे हे वन्यजीव अभयारण्याला कोणत्याही प्रकारचा जागतिक निधी देण्यात आलेला नाही. परंतु जेव्हा या अभयारण्यासाठी पहिल्यांदा निधी देण्याची गरज भासली तेव्हा चीनने संधीचा फायदा घेत भूभागावर दावा केला. चीनच्या या प्रकल्पावा केलेल्या विरोधानंतरही कौन्सिलने याला मंजुरी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like