पोलिसांना मारहाणीची ‘हिंमत होतेच कशी ? सोनालीचा संतप्त सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. लोकांना गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही बेजबाबदार नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांना घरातून बाहेर पडण्यापासून थांबवण्यासाठी पोलीस दिवसरात्रा काम करत आहे. तरीही पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना सतत समोर येत आहे. नुकतीच पिंपरीतील काळेवाडी येथे पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर आली. त्यावर अभिनेता हेमंत ढोमेने तीव्र शब्दात लोकांना सुनावले. त्यापाठोपाठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

पोलिसांना मारहाणीची ‘हिंम्मत होतेच कशी ? एकीकडे आम्ही पोलिसांना मानवंदना देतोय आणि दुसरीकडे हे मानव ??? मानवंच म्हणायचं ना यांना ? लगेच जेल मध्ये घाला’ असे म्हणत तिने पिंपरीमध्ये घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तर अभिनेता हेमंत ढोमेने ‘बंदुक द्या पोलिसांना, काठ्या माणसांसाठी असतात. या जनावरांसाठी गोळ्याच. हिंमत नाही झाली पाहिजे परत’, अशा शब्दांत पोलिसांना मारहाण करणार्‍यांवर संताप व्यक्त केला. अशा घटना या पूर्वीही घडल्या असल्याचे समोर आले होते. त्यावर कलाविश्वातून अनेक कलाकारांनी निषेध व्यक्त केला होता. तसेच कलाकारांनी आपल्यासाठी दिवसरात्र काम करणार्‍या पोलीस, डॉक्टर, नर्सेस यांच्या कामाचे गांभीर्य असू द्या असे म्हटले होते.