Money laundering case : आ. सरनाईकांपाठोपाठ आणखी एक सेना नेता ED च्या ‘रडार’वर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर (after-pratap-sarnaik-one-more-shiv-sena-leader-eds-radar) असल्याचे समजते. मनी लॉंड्रिंग प्रकरणात या नेत्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली जाणार असल्याचे कळते. यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबबतचे वृत्त एका मराठी वृतवाहिनीने दिले आहे.

टॉप्स एजन्सी प्रकरणात आमदार सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर गेल्या आठवड्यात ईडीने धाडी टाकल्या. त्यांचे पुत्र विहंग यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर आता शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर असून, या नेत्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची ईडीकडून मनी लॉंड्रिंग प्रकरणात चौकशी होऊ शकते. अशी चौकशी झाल्यास शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार आता ईडीला रोखण्याच्या तयारीत असल्याचे समजते. सीबीआयला राज्यात येण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता असते. तशाच प्रकारे ईडीलादेखील राज्यात येऊन तपास, चौकशी करण्यासाठी परवानगी घेणे सक्तीचे करू शकतो, याची चाचपणी सध्या राज्य सरकारकडून सुरू आहे.

ईडी, सीबीआयला पाकिस्तान, चीनच्या सीमेवर पाठवा – खा. राऊत
विरोधकांना गप्प बसवण्यासाठी केंद्र सरकार यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ईडी, सीबीआयचा वापर शत्रूला जेरीस आणण्यासाठी केला जातो. त्यामुळे ईडी, सीबीआयला केंद्राने पाकिस्तान, चीनच्या सीमेवर पाठवावे. त्यामुळे आपले शत्रू नामोहरम होतील, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. तुम्हाला ईडीची नोटीस आली का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर अद्याप तरी नोटीस आलेली नाही. मी वाट बघतोय, असे उत्तर राऊत यांनी दिले आहे. सध्या ईडी, सीबीआयकडून उत्खननाचे काम सुरू आहे. ते हडप्पा, मोहंजोदडोपर्यंत पोहोचले आहेत, असा चिमटादेखील त्यांनी काढला आहे.

You might also like