अक्षय कुमारचा मोठा निर्णय, ‘केसरी’ मधून पाक गायकाची हकालपट्टी

मुंबई : वृत्तसंस्था – पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय ४० जवान शहीद झाले. त्यानंतर या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. तसेच याहल्ल्यानंतर बॉलिवूडकरांनीही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या हल्ल्याला विरोध म्हणून सलमानने त्याच्या चित्रपटातून पाकिस्तानी गायकाचं गाणं हटवलं होत. आता त्याच्या पाठोपाठ अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटातूनही पाकिस्तानी गायकाचं गाणं हटवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटात पाकिस्तानी गायकाचं गाणं होत ते गाणं हटवण्यात आलं आहे. याबाबत करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि अक्षय कुमारच्या टीमला विचारल्यावर त्यांनी मात्र याविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार देत याबाबत गप्प राहणंच पसंत केलं.

अक्षयचा हा ‘केसरी’ चित्रपट भारतीय जवानांनी अफगाणी सैन्याशी दिलेल्या लढ्याच्या सत्यघटनेवर आधारित युद्धपट आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहे. २१ फेब्रुवारीला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. २१ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ह्याही बातम्या वाचा –

प्रेमात अडथळा : प्रियकराच्या मदतीने आईनेच काढला मुलाचा काटा

भारतीय संघाची पुलवामातील शहिदांना अनोखी ‘आदरांजली’

शिल्पा शेट्टीचे जबरदस्तीने चुंबन घेणारा हॉलिवूडचा ‘हा’ दिग्गज अभिनेता वयाच्या ६९ व्या वर्षी बनला बाबा

प्रियंका सोबत काम करण्यास सलमानचा नकार