‘रामायण’ आणि ‘शक्तीमान’नंतर आता दूरदर्शनवर जुन्या जाहिरातींची ‘वापसी’ ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन :दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत, शक्तीमान अशा अनेक जुन्या मालिकांनंतर आता जुन्या जाहिरातीही पुन्हा वापस आल्याचं दिसत आहे. दूरदर्शन आता पूर्णपणे 90 च्या दशकात परत गेला आहे. अनेक जुन्या मालिका तर सुरू झाल्याच आहेत, सोबतच त्या काळातील जाहिरातीही पुन्हा दिसत आहेत. याची सुरुवात अमूलनं केली आहे. अमूलनं त्या जाहिराती पुन्हा आणल्या आहेत ज्यात 90 च्या दशकाची आठवण येते. सोशलवरून अमूलनं याबाबत माहिती दिली आहे.

अमूलनं ट्विट केलं की, “लोकांच्या विनंतीनंतर आता आम्हीही रेट्रो मोडमध्ये आलो आहोत. 1990 च्या क्लासिक अमूलच्या जाहिराती डीडीवर रामायण आणि महाभारत या शोच्या मध्ये पहा.

याशिवाय अमूलनं आपल्या जुन्या जाहिराती सोशलवरून शेअर केल्या आहेत ज्या प्रसार भारतीनं रिट्विट केल्या आहेत. अमूल नेहमीच प्रत्येक इव्हेंटवर क्रिएटीव अॅड बनवत असतं. सध्या देश नॉस्टेलजियाच्या मूडला एन्जॉय करत आहे हे पाहून आता अमूललाही ही संधी गमवायची नव्हती असं दिसतंय. सध्या अमूलनं केलेलं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सध्य डीडीवर सुरू असणाऱ्या 90 च्या दशकातील मालिकांना तरुण पिढी आणि 90 च्या दशकातील किड्स एन्जॉय करताना दिसत आहे. दरम्यान रामायण ही मालिका आजही लोकप्रिय ठरताना दिसत आहे.