विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी निवडीनंतर दरेकर म्हणाले…

नागूपर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाने विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेतेपदासाठी माझे नाव निश्चित केले आहे. तसा ठराव पक्षाने केला आहे. मी या पदाच्या माध्यमातून पक्ष आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर विधिमंडळ परिसरात ते माध्यमांशी बोलत होते.

आपल्या निवडीबद्दल दरेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व भाजपा अध्यक्ष अमित शाह, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक आणि भाजपाच्या सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो. सर्वानुमते माझी निवड केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.

दरम्यान, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड करतानाच भाजपाने विधानपरिषद मुख्य प्रतोद म्हणून आमदार सुरजितसिंह ठाकूर तर ज्येष्ठ नेते आमदार भाई गिरकर यांना विधिमंडळ गटाचे उपनेता म्हणून जबाबदारी दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/