धनंजय मुंडेंनी ‘छोटा नीरव मोदी’ संबोधलेले रासप नेते रत्नाकर गुट्टे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गंगाखेड शुगर्सचे चेअरमन व रासपचे नेते आणि धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रातील छोटा नीरव मोदी संबोधलेले रत्नाकर गुट्टे यांना २२ बोगस कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून २६ हजार शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाने अखेर आज अटक केली. त्यांनी शेतकरी व बँकांची ३०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

गंगाखेड शुगर्स कारखान्याने हार्वेस्ट अन्ड ट्रान्सपोर्ट योजनेखाली २०१५ मध्ये रत्नाकर गुट्टे यांनी ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलले. त्यानंतर मिळालेली वाहने काऱखान्याला कामावर लावली. कारखान्याने या रकमा बँकांना परतफेड केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना २० ते २५ लाख रुपये कर्जाच्या वसूलीच्या नोटीस आली. त्यासोबतच शेतकरी नवीन कर्ज घेण्यासाठी गेल्यावर त्यांना सीबीलमध्ये आपल्यावर कर्ज असल्याची माहिती मिळाली. गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे शेकडो कोटी रुपयांचे पीककर्जही उचलले होते. त्याच्या वसूलीसाठी बँकांनी तगादा लावल्याने हा प्रकार समोर आला होता. न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिल्यानंतरही कारवाई झाली नव्हती. तर गुट्टे यांच्यावर ५ जूलै २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांन २० महिन्यांनी अटक करण्यात आली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातील छोटा नीरव मोदी असल्याचं संबोधलं होतं. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.