नगर अर्बन बँकचे संचालक सुवालाल गुंदेचा यांचे निधन 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर अर्बन मल्टीस्टेट बॅकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक सुवालाल गुंदेचा (वय ८४) यांचे मध्यरात्री निधन झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यामागे तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’029b84f0-d108-11e8-ad83-1500ee11766a’]

सुवालाल गुंदेचा हे शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या नगर अर्बन बॅकेचे सलग बारा वर्षे अध्यक्ष होते, तर ४८ वर्षे संचालक म्हणून त्यांनी काम केले. सहकारातील कायद्याचा अभ्यास व बँकेच्या हितासाठी त्यांनी आयुष्य वेचले. अहमदनगर बॅक  असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र बॅकीग फेडरेशनचे अध्यक्ष, जैन ओसवाल सभेचे २५ वर्षे अध्यक्ष, जैन वात्सल्य संस्था व जैन धर्मशालेचे ३० वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. काँग्रेस पक्षातही ते काम करीत होते. दहा वर्षापूर्वी त्यांनी नगर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली होती, मात्र त्यांना यश मिळाले नव्हते.

#MeToo : खटला लढणार; एम. जे. अकबर यांना पत्रकार प्रिया रमाणीचे प्रतिआव्हान

गुंदेचा यांच्यावर  नगर येथील नालेगाव स्मशानभूमित सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.