Ahmednagar ACB Trap | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar ACB Trap | पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात (Ahmednagar Crime) मदत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पोलीस हवालदाराला (Police Constable) अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Ahmednagar) रंगेहाथ पकडले. अण्णासाहेब बाबुराव चव्हाण Annasaheb Baburao Chavan (वय-52 रा. लक्ष्मीनगर, मांडवगण रोड, श्रीगोंदा) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Ahmednagar) ही कारवाई मंगळवारी (दि.7) राशिन येथे केली. (Ahmednagar ACB Trap)

 

अण्णासाहेब चव्हाण हे कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक राशीन दुरक्षेत्र येथे आहे. भोंबोरा येथील 37 वर्षीय तक्रारदाराने याबाबत अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि.6) तक्रार केली होती. तक्रारदार यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (FIR) दाखल असून या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चव्हाण यांनी 30 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी अहमदनगर एसीबीकडे (Ahmednagar ACB Trap) तक्रार केली.

 

पथकाने पडताळणी केली असता चव्हाण याने 30 हजार रुपये लाच मागून तडजोडीअंती 20 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार आज (मंगळवार) राशिन येथे सापळा रचण्यात आला. अण्णासाहेब चव्हाण यांना तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक काद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर (Deputy Superintendent of Police Harish Khedkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे (Police Inspector Sharad Gorde),
पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,
महिला पोलीस नाईक राधा खेमनर, संध्या मस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Ahmednagar ACB Trap | police hawaldar arrested for taking bribe of 20 thousand in karjat Ahmednagar ACB Trap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Trap On Police Sub Inspector | आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक (PSI) 3 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

 

Pradip Bhide Passes Away | दूरदर्शनचा चेहरा ‘हरपला’ ! सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे याचं 65 व्या वर्षी निधन

 

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या