श्रीगोंदा : ज्येष्ठ नेते सदाशिव उर्फ सदाअण्णा भिकाजी पाचपुते यांचं निधन !

श्रीगोंदा : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते सदाशिव उर्फ सदाअण्णा भिकाजी पाचपुते यांचं आज दुपारी निधन झालं आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

उपचार सुरू झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत होती. परंतु त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. आमदार बबनराव पाचपुते यांचे ते बंधू होते.

पडद्यामागे राहूनही त्यांनी तालुक्यात चांगला जम बसवला होता. तालक्यातील राजकारणाची धुरा त्यांच्याच खांद्यावर होती. ते बरे व्हावेत यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मंदिरात महाआरती केली होती. सर्वजण ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही करत होते.