कर्नाटकमधील प्रदेश काँग्रेस समिती ‘बरखास्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर काँग्रेस पक्षामध्ये अनेक बदल होण्याचे संकेत मिळत आहे. कर्नाटक मधील निराशाजनक कामगिरी आणि प्रदेश काँग्रेसमधील वाढते वादविवाद यांमुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ने मोठे पाऊल उचलले आहे. आज (बुधवारी) प्रदेश काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पार्टीचे संघटन महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ने कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती बरखास्त केली असून अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष पद मात्र तसेच ठेवले आहे.

काय आहे कारवाईचे कारण
अशा प्रकारचे कडक पाऊल उचलण्याचे कारण जरी काँग्रेसने स्पष्ट केलेले नसले तरीही लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभवच याचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. कारण यासंदर्भात लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे कर्नाटकमध्ये जनता दल (एस) बरोबर आघाडी करून निवडणूक लढविली असूनदेखील काँग्रेस ला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आलेला आहे.

यासंदर्भात नुकत्याच झालेल्या घडामोडी पाहता कर्नाटक काँग्रेस चे वरिष्ठ नेते आणि बंडखोर आमदार रोशन बेग यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाने निलंबित केले होते. प्रदेश काँग्रेस समिती ने रोशन बेग यांच्यावर पक्षविरोधी काम करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. याची तात्काळ दाखल घेत पार्टीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही