Air India चा सौदा झाला पक्का ! DIPAM ने सांगितले – ‘18000 कोटी रुपयांच्या करारावर झाले हस्ताक्षर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एयर इंडिया (Air India) च्या विक्रीच्या सौद्यावर आता पूर्णपणे शिक्कामोर्तब झाले आहे. सरकारने टाटा सन्स (Tata Sons) सोबत एयर इंडियाच्या विक्रीसाठी शेयर खरेदी करारावर हस्ताक्षर केले आहे. यानंतर आता एयर इंडिया टाटा सन्सची झाली आहे. सौद्यात एयर इंडिया (Air India Express) आणि ग्राऊंड हँडलिंग कंपनी एआयएसएटीएस (AISATS) च्या विक्रीचा सुद्धा समावेश आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात सरकारची भागीदारी विक्रीचे व्यवस्थापन करणार्‍या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (DIPAM) सचिव तुहिन कांत पांडे यांनी शेयर खरेदी करारावर (Share Purchase Agreement) हस्ताक्षर करत आपल्या ट्विटर प्लॅटफॉर्मवर छायाचित्र शेयर केले आहे.

सोबत लिहिले आहे की, एयर इंडिया रणनिती निर्गुंतवणुकीसाठी टाटा सन्ससोबत सरकारकडून आज शेयर खरेदी करारावर हस्ताक्षर करण्यात आले.

टाटा घेणार 15,300 कोटी रुपयांच्या कर्जाची जबाबदारी सरकारने टाटा सन्सचे युनिट टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडकडून एयर इंडियासाठी लावलेली बोली स्वीकारली होती.
या बोलीमध्ये 2700 कोटी रुपये रोख आणि एयरलाईनच्या 15,300 कोटी रुपयांच्या कर्जाची जबाबदारी घेण्याचा प्रस्ताव दिला होता.

यानंतर 11 ऑक्टोबर 2021 ला एयर इंडिया एयरलाइनमध्ये सरकारची 100 टक्के भागीदारी विक्रीच्या दुजोर्‍यासाठी टाटा ग्रुपला एक लेटर ऑफ इंटेंट (LoI) जारी करण्यात आले.

 

Web Title :- Air India | air india share purchase agreement with government and tata sons for air india disinvestment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPL 2022 Team Auction | अहमदाबाद आणि लखनऊ संघ खेळणार आयपीएल, BCCI ला मिळाले 12 हजार कोटी

Pune Fire | पुण्यातील गंगाधाम चौकातील फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; अग्नीशमनचे 14 बंब घटनास्थळी दाखल

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 889 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी