Pune Fire | पुण्यातील गंगाधाम चौकातील फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; अग्नीशमनचे 14 बंब घटनास्थळी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire | पुणे शहरातील गंगाधाम चौकातील (Gangadham Chowk) आई माता मंदिराजवळील श्री जी लॉन्स येथे असलेल्या एका फर्निचरच्या गोडावुनला आज (सोमवार) रात्री 8.42 वाजता भीषण आग लागली आहे. आगीची वर्दी मिळताच अग्नीशमनचे तब्बल 14 बंब घटनास्थळी दाखल झाले असून जवांनाकडून आग अटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे (Pune Fire) प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास फर्निचरच्या गोडाऊनला आग लागली. काही मिनीटांमध्येच आगीनं रौद्र रूप धारण केलं. अग्नीशमन दलाचे तब्बल 14 बंब वर्दी मिळाल्यानंतर काही मिनीटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आग भीषण असल्यानं खासगी बंब देखील मागविण्यात आल्याची माहिती अग्नीशमनकडून देण्यात आली आहे. परिस्थिती अटोक्यात आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही अशी माहिती आतापर्यंत प्राप्त झाली असल्याचं अग्नीशमनकडून (pune fire brigade) सांगण्यात आलं आहे.

 

स्थानिक पोलिस आणि अग्नीशमन दलाकडून आग अटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्नीशमनच्या जवानांकडून आग पुर्णपणे विझविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्यातरी घटनास्थळी 14 बंब आग विझवण्यासाठी कार्यरत असल्याचं अग्नीशमनकडून सांगण्यात आलं आहे.


Web Title :- 
Pune Fire | A huge fire broke out at a furniture godown at Gangadham Chowk in Pune; pune fire brigade on the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winters Superfood | आला हिवाळ्याचा हंगाम ! आजारांपासून बचाव करायचा असेल तर खाण्यास सुरूवात करा ‘हे’ 10 सुपरफूड

Eknath Khadse | पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

Pune BJP | 100 कोटी डोस पूर्ण झाल्याने पुणे भाजपकडून लसीकरण केंद्रात केक कापून ‘सेलिब्रेशन’

Dilip Walse Patil | समीर वानखेडेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी ‘जुजबी’ चर्चा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

Pune Crime | विमान तिकीटाचे पैसे मागितल्यास आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची ट्रॅव्हल्स कंपनी मालकाची धमकी

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेम चेंजर्स’ संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला