air india announces e auction | दिल्ली-मुंबईसारख्या शहरामध्ये १३ लाखात घर घेण्याची संधी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – air india announces e auction |   दिल्ली-मुंबई (Delhi-Mumbai) सारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचा फ्लॅट किंवा मालमत्ता असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात येऊ शकते तेही अगदी कमी किमतीत. कारण एअर इंडिया (Air India)  हि विमान कंपनी (Airline) देशातील काही शहरांमधील आपले अनेक फ्लॅट्स (Flats) आणि निवासी, व्यावसायिक (Commercial) आणि भूखंड अशा मालमत्ता विकण्याची योजना आखत आहे. या विक्रीतून २५० ते ३०० कोटी जमा करण्याची कंपनीची योजना असून हि मालमत्ता १० मोठ्या शहरातील रहदारीच्या ठिकाणी आहे.

दरम्यान कंपनीने यासाठी ई-बोली ( e auction) घेण्याचे ठरवले असून हि बोली ८ जुलै पासून सुरू होईल आणि ९ जुलैला बंद होईल. सुरुवात १३.३ लाखांपासून सुरु होणार आहे. दीडशे कोटी रुपयांपर्यंत ग्राहकां (Customer) ना बोली लावता येणार आहे. यापूर्वी अनेकदा ज्या मालमत्ता विक्रीसाठी ठेवल्या गेल्या होत्या त्याचाही या लिलावाच्या स्लॉटमध्ये समावेश केला आहे. याबाबतचे वृत्त मनी कंट्रोल (Moneycontrol) ने दिले आहे. air india e auction 8 july 2021 you can buy own flat or property just 13 lakh check details

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

विक्री संदर्भात एअर इंडिया (Air India) ने एक नोटीस जाहीर केली आहे, त्यामध्ये मुंबई (Mumbai) त एक निवासी प्लॉट व फ्लॅट, (Residential plots and flats)
नवी दिल्ली (New Delhi) त पाच फ्लॅट, बंगळुरू (Bangalore) मध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता (Kolkata) येथे चार फ्लॅट आहेत. त्याची विक्री करणार असल्याचे म्हंटले आहे.

त्याचप्रमाणे औरंगाबाद (Aurangabad) मध्ये एक बुकिंग कार्यालय आणि स्टाफ क्वार्टर, नाशिकमधील सहा फ्लॅट्स, नागपुरात बुकिंग कार्यालय,
भुजमधील एअरलाइन्सचे हाऊस आणि एक निवासी प्लॉट, तिरुअनंतपुरममधील एक निवासी प्लॉट आणि मंगळुरू येथे दोन फ्लॅट यांचाही विक्री मध्ये समावेश करण्यात आला आहे.
खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी एअर इंडियाने काही मालमत्तांमध्ये विशेषत: टियर १ शहरांमध्ये राखीव किंमत कमी केली आहे. म्हणजेच विशेष सवलतही देण्यात आली आहे.
या मालमत्तांमध्ये सुमारे १० टक्के कपात करण्यात आल्याचे एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page
and Twitter for every update

Web Title : air india e auction 8 july 2021 you can buy own
flat or property just 13 lakh check details

 

हे देखील वाचा

Pune Crime News | अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍यास ‘ढोंगी बुवा’ अन् महिलेनं संपवलं;
पुण्याच्या कात्रज घाटात फेकला मृतदेह

Pune News | ठाकरे सरकारसाठी नामुष्की ! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी नाही,
तणावातून स्वप्नील लोणकरची आत्महत्या; जाणून घ्या

20 Rupees Note | जर तुमच्याकडे आहे Rs 20 ची Note तर घरबसल्या कमावू शकता हजारो,
जाणून घ्या पद्धत